Showing posts with label Article. Show all posts
Showing posts with label Article. Show all posts

Saturday, 7 May 2016

माझी आई

          

          आज ही ती मला 'बाळ' म्हणूनच हाक मारते ..ते म्हणतात ना मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती तिची बाळचं असतात , तसाच हा तिचा अनुक्रम ..शाळेपासून ते आता ऑफिस पर्यंत ती मला जेवणाचा डब्बा बनवून देते ..तिला कितीही सांगितलं की कॅन्टीनमध्ये मिळतं गं चांगलं जेवण तरी ती ऐकत नाही , " काय रे ते सोडा टाकलेलं जेवण आवडतं तूला ? " अशी रागावते ..मग मला कधी पहाटे लवकर जायचे असेल कामावर तर माझ्या सोबतच उठते खास डब्बा बनवण्यासाठी ..ह्या तिच्या अश्या लाडामुळे साहजिकच माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी तिला " तू फक्त त्याचीच आई आहेस " अशी तक्रार करतात ..तिच्याकडे असा दुजाभाव नाही आहे .. आईसाठी तिची सर्व लेकरे सारखीच असतात ..पण  हे जरी असे असले तरी मी तिचा सर्वात लाडका होतो आणि अजून ही आहे हे मात्र तेवढेच खरे ...
          घरात सर्वात लहान असल्यामुळे माझे सर्वात जास्त लाड झालेत ..सर्व साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाल्यामुळे मी ही कधी फार मोठ मोठे हट्ट नाही केलेत तिच्याकडे ..पण आठवतं शाळेत प्रथम क्रमांक आल्यावर ती मला नेहमी एखादा Game घेवून द्यायची आणि एकदा scholarship मिळाल्यावर मी तिला video game घेवून देण्यासाठी केलेला हट्ट जो तिने त्या काळात सर्वात महागडा video game विकत घेऊन देऊन पूर्ण केला होता ..लहान असतानाचा एक वाढदिवस आठवतो , पूर्ण दिवसभर हिरमुसलेलो होतो मी काही कारणामुळे .. मग अचानक संध्याकाळी आइने नवीन टी-शर्ट आणला माझ्यासाठी ..कसला खुश झालो होतो ... मी शाळेत असताना माझा वाढदिवस ही ती खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करायची ... मला मंदिरात घेऊन जायची आणि मग मंदिरा बाहेर बसणाऱ्या गरीबांना भाजी-पोळी , बटाटा वडा , लाडू इत्यादि असे खाण्याचे पदार्थ माझ्या हातून द्यायची ...
७वीत असताना मित्रांसोबत एरियामध्ये ३१ डिसेंबरची पार्टी आठवते .. १०० ₹ कॉन्ट्रिब्यूशन होतं ... बहिणींचा सरळ सरळ विरोध होता " कसल्या पार्ट्या करतोय, कुठे ही पाठवू नकोस आई ह्याला " ..आई ही त्यांच्याशी सहमत वाटली , मग मला नाराज झलेले पाहुन तिने मला किचनमधुन साखरेच्या बरणीमधून थोड़ी साखर आणून दे असे सांगितले , बरणी उघडून पाहिले तर आतमध्ये एक कोरी करकारीत १०० ची नोट माझी वाट पाहत होती ...आईने दुरुनचं मला शांत राहण्याची खूण केली ..आज हज़ारो रुपय खर्च करून ही त्या दिवशी केलेल्या पार्टीतली धमाल पुन्हा अनुभवायला नाही मिळाली ..  शाळेतील सहल म्हटलं की आईकडूनच परवानगी आणि सहलीची फीस मिळवायची ..
          जस जसा मोठा होत गेलो तस तसा तिच्या मनाच्या मोठेपणाचा अंदाजा येऊ लागला ... फक्त अंदाजा , कारण त्याचा पूर्ण ठाव कोणालाच घेता नाही येणार ..स्वतः देवाला ही नाही...ह्या जगाच्या पाठीवर तुमची आईच एक अशी व्यक्ति असते जी तुमच्यावर लाभेवीण प्रीति करत असते , तिच्या प्रेमाची पुसटशी तुलना ही कोणा सोबत होऊ शकत नाही ... आणि तिने केलेल्या तुमच्यावर प्रेमाची भरपाई वगैरे लांबच राहू द्या तुम्ही केलेली नुसती तिच्या प्रेमाची जाणीव देखील तिला सुखावून जाते .. मूर्तिमंत त्याग म्हणजे आई ..
          आज Mother's Day च्या निमित्ताने ह्या सर्व लहान-सहान आठवणींची उजाळणी करण्याचे ठरवले ...
माउली तुला कोटी कोटी प्रणाम ....

- हर्ष पवार

Thursday, 20 August 2015

सूर तेच छेडिता .....

गिटार हे एक असे वाद्य आहे ज्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते.बहुतेक सर्वांच्याच मनात कधी तरी आपण ही गिटार वाजवायला शिकावे हा विचार आलेला असतो. हिंदी सिनेमामध्ये तर गिटारला वेगळेच स्थान आहे. सिनेमामधील नायकाचे सर्वात आवडते वाद्य म्हणजे गिटार.गिटार म्हटल की आठवतो हातात गिटार घेऊन नायीकेच्या अवती-भवती "बार बार देखो हजार बार देखो" गाणारा शम्मी कपूर किंवा आठवतो नायीकेच्या अतीव सौंदर्याचे गिटार वाजवत "चेहरा हे या चाँद खिला हे" गाणारा ऋषी कपूर किंवा अगदी नजीकच्या काळातील सलमान खान आठवतो विदाउट शर्ट गिटार घेऊन "ओ ओ जाने जाना ढूंढे  तुझे दिवाना" गाताना. गिटारची लोकप्रियता वाढवण्यामध्ये हिंदी सिनेमाचे ही मोठे योगदान आहे असे म्हटले तर चुकीचे नाही.

Friday, 10 April 2015

रक्तदान..... काळाची गरज!!!


पुढे येणारा काळ कसा असणार आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही … महागाई वाढत चालली आहे … पेट्रोल डीझलचे भाव दर महिन्याला वाढत चालले आहेत … जागतिक मंदी येत चालली आहे … पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे … हे सगळ असच चालत राहिल तर तिसर महायुद्ध दूर नाही!!! … समजा येणा-या काळात तिसर महायुद्ध झालं आणि त्यात भारताला ही अनेक देशांशी युद्ध करावं लागलं … देशाची फार मोठया प्रमाणावर हानी झाली आहे …युद्ध संपलं आहे…देश हळू हळू पूर्णपणे स्थिर होत आहे …जन-जीवन पुन्हा सुरळीत होत आहे पण नेमकं झालं काय आहे तर तिसर्‍या महायुद्धात देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी पुरवल्या गेलेल्या रक्ता मुळे , देशातल्या blood banks मध्ये रक्तच उरलं नाही आहे …तिसर्‍या महायुद्धात जगातील बहुतेक सर्वच देशांचा सहभाग असल्यामुळे कोणता ही देश एकमेकांना रक्ताच्या bottles विकत ही देत नाही आहे …. अश्या भारताचे चित्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे ….साल २०५० चालू आहे :

Saturday, 4 April 2015

इच्छा , आकांक्षा , इत्यादी ……….

त्या  दिवशी तसा ऑफिसमधून निघायला उशीरच झाला होता..शेवटच्या क्षणापर्यंत काम संपतच नव्हतं... खाली थांबलेल्या कंपनी Cab ड्रायवरचा ही दोन वेळा फोन येऊन गेला होता. त्याला ५ मिनीट आणखी थांब अशी request केली होती.. ड्रायवरचा तिसऱ्यांदा call येत होता.. शेवटी वैतागून PC shut down करून, bag pack करून लिफ्टच्या दिशेने पळालो. खाली आलो आणि धावत जाऊन Cabमध्ये बसलो. ड्रायवरला sorry म्हणालो उशीर झाल्या बद्दल …त्याने "ठीक आहे साहेब " असे म्हणत गाडी स्टार्ट केली .. Cabमध्ये  बसताच सवयीप्रमाणे bagच्या पहिल्या कप्प्यामधून हेडफोन बाहेर काढला. कधी नाही ते हेडफोनच्या वायर्सचा गुंता झाला होता. सुटता सुटत नव्हता.. एका क्षणाला विचार आला गेल्या काही दिवसांपासून आयुष्यात ही असाच प्रश्नांचा गुंता झाला आहे.. प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध घडत आहे. प्रत्येक अंदाज चुकत आहे.. क्षणार्धात भानावर आलो आणि कसाबसा वायर्सचा गुंता सोडवला.. हेडफोनची पिन मोबाइलमधे प्लग केली आणि हेडफोन कानाला लावला .पण त्या दिवशी चित्त ठिकाण्यावर नव्हतं. त्यामुळे कोणतं ही गाणं अगदी 10 सेकंदाहून जास्त लक्ष्य केंद्रित करून घेऊ शकत नव्हतं. मनात असंख्य विचारांचे काहुर माजलेले होते. माझ्या PLAYLISTमधील गाणी मी सतत shuffle करत बसलो होतो.. mood change करण्याचा माझा हा प्रयास असफल ठरत होता . शेवटी 15-20 मिनिटानंतर एका गाण्याचे सुरुवातीचे शब्द मनाला आकर्षित करते झाले :

क्या करे जिंदगी
इसको हम जो मिले
इसकी जान खा गए
रात दिन के गिले ...
.

Thursday, 5 March 2015

आज तुझ्या सोबत होळी बापू …!!!

एरवी तू वर्षभर तुझ्या प्रेमाचे रंग माझ्या वर उधळत असतोस ..पण आज माझी पाळी आहे तुला रंग लावण्याची ...

Saturday, 14 February 2015

पाऊस, मी... व हरवलेली ती...

त्या दिवशी पहाटे पासूनच सतत पाउस पडत होता. जाग येताच खिडकीच्या बाहेर पाहिले तर पावसाच्या सरी वाऱ्यावर आरूढ होऊन एकामेकींना अगदी चिटकून वाहत असतांना दिसत होत्या. पावसाचं आणि तुझं फार जवळचं नातं आहे हे तुला ही निट ठाऊक असावं, नाही का? त्यामुळे साहजिकच त्या पावसाला पाहून तुझी आठवण आली. वाटलं २ मिनिट का होईना पण आज तुला कसे ही करून भेटायचे. मागे आलेल्या वादळामुळे आठवणींवर खूप धूळ जमा झाली होती. तुला भेटून आणि तुझ्या सोबत थोडं भिजून सर्व जुन्या आठवणींना स्वच्छ धूऊन काढायचं होतं.

Friday, 9 January 2015

केमिकल लोचा...सांभाळा!!!

हा शब्द ऐकून आठवतो मला माझ्या आवडता सिनेमा ' लगे रहो मुन्ना भाई ' मधला एक प्रसंग … मुन्ना भाईला सर्वीकडे गांधीजी दिसत असतात … त्यामुळे त्याची उडालेली तारांबळ आपण पाहिलेली आहे .आपल्यासाठी हा गमतीचा विषय असतो पण मुन्नाभाईसाठी हा गंभीर प्रकार असतो . ' त्याला गांधीजी दिसतात ' ह्या त्याच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नसतो …शेवटी मुन्नाभाई त्याच्या जिवलग मित्राला , सर्किटला आपली व्यथा वैतागून सांगतो " अपून के भेजे में साला केमीकल लोचा है " !

Monday, 22 December 2014

सख्खे मित्र

मित्र आणि मैत्री आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक …बालवाडीतला पहिला दिवस आठवून पहा … त्या दिवशी झालेली तुमची रडारड आठवेल … आई बाबांचा हात सुटता सुटत नसतो पण तरी देखील ते तुम्हाला धीर देत, शांत करत वर्गात जाण्यासाठी पुढे करत असतात … पुढे पाउल टाकतांना तुम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे वळून त्यांना पाहत असता आणि कसे तरी जाऊन बाका वर बसता … डोळ्यातून अश्रूंचं वाहण चालूच असतं  … तेव्हा तिथे त्या बाकावर तुमच्या शेजारी  बसलेला तुमचा पहिला मित्र तुम्हाला भेटतो … बहुतेक वेळी हा तुमच्या शेजारी बसलेला मित्र तुमच्याहून थोडा धीट असतो … तो तुमच्याकडे पाहून सुंदर हसतो आणि जणू त्याचं हसणं तुम्हाला त्या लहान वयात ही धीर देऊन जात , तुमच रडणं बंद करून टाकतं … ' हो आहे कोणी तरी आपल्यासाठी इथे 'असं वाटतं … खरंतर तो पहिला दिवस बालवाडीतला, तुमचा मैत्रीच्या विश्वातील पदार्पणाचा पहिला दिवस असतो … तिथून सुरु होतो तुमचा प्रवास एका ' मैत्री ' नावाच्या सुवर्ण वाटे वरती …