Wednesday, 28 January 2015

जीवाभावाचे संगीत

' देवाने आपल्याला दिलेली सर्वात अमुल्य भेट कोणती ?' असा प्रश्न जर कोणी मला केला तर माझे उत्तर एकचं असेल " संगीत " ! नाही म्हणजे पाउस, झरे, वारा, नद्या ,द-या, फुलं ह्या सर्व गोष्टीही ' त्याचीच ' कृपा आहे पण ह्या सर्वांमध्ये मला संगीत सर्वात जास्त जवळचं वाटतं …आणि पाहायला गेल तर टिप टिप पडणा-या पावसामध्ये  ,खळ खळ वाहणा-या झ-यांमध्ये ,सुसाट फिरणा-या वा-यामध्ये ही संगीत आहेचं ना ?…लक्ष देऊन ऐकले तर संथ वाहणारी नदी ही एक मंजुळ गाणं गात असल्याचे ऐकू येते …

पक्ष्यांनी आपसात केलेली कुजबूज ,कोकिळेचे मधुर गान ,किर्रर रानामध्ये होणारा रात किड्यांचा आवाज ह्या सर्वांमध्ये ही संगीत लपलेलें आहेचं  . . जिथे ध्वनी आहे तिथे संगीत आलेच ! प्रेमात धुंद असणा-या प्रियकराला त्याच्या प्रेयसी ने केलेली तक्रार ही  एका गाण्यासारखीच वाटत असते , ९ महिने ज्या बाळाला आई तिच्या पोटात सांभाळते , ते बाळ जेव्हा ह्या विश्वामध्ये येते तेव्हा त्या बाळाच्या  रडण्याचा आवाज त्या मातेला कर्कश न वाटता जगातील कोणत्या ही गाण्याहून ,कोणत्याही संगीताहून अधिक प्रिय वाटतो …

Monday, 19 January 2015

दिल मे बसा के तेरा प्यार.....

दिल मे बसा के तेरा प्यार
आँखों मे लिए तेरा इंतजार
मैं घूमा करता हु
दिखे जहा तेरे कदमो के निशान
झुक के मैं उन्हें चूमा करता हु !

Friday, 9 January 2015

केमिकल लोचा...सांभाळा!!!

हा शब्द ऐकून आठवतो मला माझ्या आवडता सिनेमा ' लगे रहो मुन्ना भाई ' मधला एक प्रसंग … मुन्ना भाईला सर्वीकडे गांधीजी दिसत असतात … त्यामुळे त्याची उडालेली तारांबळ आपण पाहिलेली आहे .आपल्यासाठी हा गमतीचा विषय असतो पण मुन्नाभाईसाठी हा गंभीर प्रकार असतो . ' त्याला गांधीजी दिसतात ' ह्या त्याच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नसतो …शेवटी मुन्नाभाई त्याच्या जिवलग मित्राला , सर्किटला आपली व्यथा वैतागून सांगतो " अपून के भेजे में साला केमीकल लोचा है " !

Monday, 22 December 2014

सख्खे मित्र

मित्र आणि मैत्री आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक …बालवाडीतला पहिला दिवस आठवून पहा … त्या दिवशी झालेली तुमची रडारड आठवेल … आई बाबांचा हात सुटता सुटत नसतो पण तरी देखील ते तुम्हाला धीर देत, शांत करत वर्गात जाण्यासाठी पुढे करत असतात … पुढे पाउल टाकतांना तुम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे वळून त्यांना पाहत असता आणि कसे तरी जाऊन बाका वर बसता … डोळ्यातून अश्रूंचं वाहण चालूच असतं  … तेव्हा तिथे त्या बाकावर तुमच्या शेजारी  बसलेला तुमचा पहिला मित्र तुम्हाला भेटतो … बहुतेक वेळी हा तुमच्या शेजारी बसलेला मित्र तुमच्याहून थोडा धीट असतो … तो तुमच्याकडे पाहून सुंदर हसतो आणि जणू त्याचं हसणं तुम्हाला त्या लहान वयात ही धीर देऊन जात , तुमच रडणं बंद करून टाकतं … ' हो आहे कोणी तरी आपल्यासाठी इथे 'असं वाटतं … खरंतर तो पहिला दिवस बालवाडीतला, तुमचा मैत्रीच्या विश्वातील पदार्पणाचा पहिला दिवस असतो … तिथून सुरु होतो तुमचा प्रवास एका ' मैत्री ' नावाच्या सुवर्ण वाटे वरती …

सखा, सारथी, सदगुरु - बापू

माझ्या घरी मी लहान होतो तेव्हा पासूनच धार्मिक वातावरण मी अनुभवलेलं आहे … घरी आई , बाबा आणि माझी आजी असे सर्वच देवपूजे मध्ये रुजू असायचे … आठवते सकाळी मी बिछान्यात असतांना माझे बाबा रोज सकाळी म्हणणारी साई बाबांची आरती " जय देव जय देव दत्ता अवधूता , साई अवधूता , जोडूनी कर तव चरणी ठेवितो माथा " माझी आई ही नेहमी पूजापाठ आणि  पोथी पारायणामध्ये मग्न असायची त्यामुळे साहजिकच माझं ही आकर्षण देवा कडे वाढलं … सकाळी अंघोळ करून झाल्यावर सर्वात आधी देवघरा समोर जाऊन देवाची प्रार्थना करायची … चौथीत असेन मी तेव्हा कदाचित …रोज सकाळी गणपतीची ' सुखकर्ता दुखार्ता ' ही आरती म्हणायचो … पुढे मोठ्या बहिणीने सांगितलं कधी ही काही दुखलं खुपलं की को-या पानावर ' Sai Sai Sai Sai Sai ' असं लिहून काढायचं पान भरून … मग कधी पोटात वगैरे दुखायला लागलं की मी एक दोन पानं ' Sai Sai Sai Sai Sai ' लिहून काढायचो आणि पोट दुखी गायब व्हायची …. देवा वर विश्वास अजून दृढ होत गेला …