Monday 22 December 2014

सख्खे मित्र

मित्र आणि मैत्री आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक …बालवाडीतला पहिला दिवस आठवून पहा … त्या दिवशी झालेली तुमची रडारड आठवेल … आई बाबांचा हात सुटता सुटत नसतो पण तरी देखील ते तुम्हाला धीर देत, शांत करत वर्गात जाण्यासाठी पुढे करत असतात … पुढे पाउल टाकतांना तुम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे वळून त्यांना पाहत असता आणि कसे तरी जाऊन बाका वर बसता … डोळ्यातून अश्रूंचं वाहण चालूच असतं  … तेव्हा तिथे त्या बाकावर तुमच्या शेजारी  बसलेला तुमचा पहिला मित्र तुम्हाला भेटतो … बहुतेक वेळी हा तुमच्या शेजारी बसलेला मित्र तुमच्याहून थोडा धीट असतो … तो तुमच्याकडे पाहून सुंदर हसतो आणि जणू त्याचं हसणं तुम्हाला त्या लहान वयात ही धीर देऊन जात , तुमच रडणं बंद करून टाकतं … ' हो आहे कोणी तरी आपल्यासाठी इथे 'असं वाटतं … खरंतर तो पहिला दिवस बालवाडीतला, तुमचा मैत्रीच्या विश्वातील पदार्पणाचा पहिला दिवस असतो … तिथून सुरु होतो तुमचा प्रवास एका ' मैत्री ' नावाच्या सुवर्ण वाटे वरती …

सखा, सारथी, सदगुरु - बापू

माझ्या घरी मी लहान होतो तेव्हा पासूनच धार्मिक वातावरण मी अनुभवलेलं आहे … घरी आई , बाबा आणि माझी आजी असे सर्वच देवपूजे मध्ये रुजू असायचे … आठवते सकाळी मी बिछान्यात असतांना माझे बाबा रोज सकाळी म्हणणारी साई बाबांची आरती " जय देव जय देव दत्ता अवधूता , साई अवधूता , जोडूनी कर तव चरणी ठेवितो माथा " माझी आई ही नेहमी पूजापाठ आणि  पोथी पारायणामध्ये मग्न असायची त्यामुळे साहजिकच माझं ही आकर्षण देवा कडे वाढलं … सकाळी अंघोळ करून झाल्यावर सर्वात आधी देवघरा समोर जाऊन देवाची प्रार्थना करायची … चौथीत असेन मी तेव्हा कदाचित …रोज सकाळी गणपतीची ' सुखकर्ता दुखार्ता ' ही आरती म्हणायचो … पुढे मोठ्या बहिणीने सांगितलं कधी ही काही दुखलं खुपलं की को-या पानावर ' Sai Sai Sai Sai Sai ' असं लिहून काढायचं पान भरून … मग कधी पोटात वगैरे दुखायला लागलं की मी एक दोन पानं ' Sai Sai Sai Sai Sai ' लिहून काढायचो आणि पोट दुखी गायब व्हायची …. देवा वर विश्वास अजून दृढ होत गेला …

Monday 15 December 2014

रोनक ए इश्क है तू मेरा - Poem on Aniruddha Kaladalan


बापूशिवाय आमच कुणीच नाही - Poem on Aniruddha Kaladalan


' फास्ट लोकल '

एखाद्या ' फास्ट लोकल ' सारखं आहे माझं आयुष्य ! सुसाट …. आणि फास्ट लोकल कशी नेमक्याच स्टेशन्सवर थांबते तसच माझं ही काही आहे … माझ्या जीवनाची फास्ट लोकल फक्त  : ' सख्खे मित्र ' , ' संगीत ' , ' सिनेमा ' , ' चविष्ट खाणं ' , ' स्पोर्ट्स ' आणि ' लिखाण ' फक्त ह्याच स्टेशन्सवर थांबते …. ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठे ही हॉल्ट  घेत नसतो …. आणि लोकल कशी मेंटेनन्ससाठी यार्डमध्ये जाते तसा मी स्वतःला रिचार्ज करून घेण्यासाठी, स्वतः मध्ये 'उत्साह' रूपी इंधन भरून घेण्यासाठी, स्वतःची दुरुस्ती करून घेण्यासाठी माझ्या लाडक्या सदगुरू "श्री अनिरुद्ध बापूंच्या " सानिध्यात जात असतो ….