Friday 20 February 2015

बिच्चारा बटाटा वडा!!!!!




तुला मी प्रसाद म्हणून ग्रहण करायचो
अलोकिक तुझी चव जिभेने चाखायचो


किती ही उशीर झाला तरी रांगेत उभा रहायचो
तू हाती येताच तुला मिटक्या मारत संपवायचो

Saturday 14 February 2015

पाऊस, मी... व हरवलेली ती...

त्या दिवशी पहाटे पासूनच सतत पाउस पडत होता. जाग येताच खिडकीच्या बाहेर पाहिले तर पावसाच्या सरी वाऱ्यावर आरूढ होऊन एकामेकींना अगदी चिटकून वाहत असतांना दिसत होत्या. पावसाचं आणि तुझं फार जवळचं नातं आहे हे तुला ही निट ठाऊक असावं, नाही का? त्यामुळे साहजिकच त्या पावसाला पाहून तुझी आठवण आली. वाटलं २ मिनिट का होईना पण आज तुला कसे ही करून भेटायचे. मागे आलेल्या वादळामुळे आठवणींवर खूप धूळ जमा झाली होती. तुला भेटून आणि तुझ्या सोबत थोडं भिजून सर्व जुन्या आठवणींना स्वच्छ धूऊन काढायचं होतं.