Friday 20 February 2015

बिच्चारा बटाटा वडा!!!!!




तुला मी प्रसाद म्हणून ग्रहण करायचो
अलोकिक तुझी चव जिभेने चाखायचो


किती ही उशीर झाला तरी रांगेत उभा रहायचो
तू हाती येताच तुला मिटक्या मारत संपवायचो


दर्शना आधी तुझे दर्शन मी घ्यायचो
आधी पोटोबा मग विठोबा असे स्वतःला सांगायचो


माझा वडा मी नाही कोणासोबत शेर करायचो
"घेउन देऊ का तुम्हाला दूसरा"? असे त्यांना विचारायचो


काल तुझ्यावर देवाने बंदी आणली असे ऐकले
आधी वाईट वाटल पण कारण कळाल्यावर पूर्ण पटले


तेल पिउन पिउन तू झाला होतास लट्ठ
वर मैद्याच्या पावाशी तुझी मैत्री घट्ट


ज्या तेलात झेप घेतोस त्यातच तू आम्हा बुडवू पाही
पण नित्य जागृत असतेच ही आमुची गुरुमाई


घात जो करू पाही अमुचा बटाटा
योग्य वेळी देवाने काढला तुझा काटा


तुझी आठवण तर हमखास येणार
तरी मी तुला कधीतरी अवचित भेटणार


असो पुढे तुझ्या रेसिपी मधे कधी बदल होणार
तेलाऐवजी "बेक" अन बटाट्या ऐवजी तुझ्यात "केळी" असणार


तेव्हा जरुर मी तुझा स्वीकार करणार
तेव्हा जरुर मी तुझा स्वीकार करणार.........



- हर्ष

1 comments: