Thursday 5 March 2015

आज तुझ्या सोबत होळी बापू …!!!

एरवी तू वर्षभर तुझ्या प्रेमाचे रंग माझ्या वर उधळत असतोस ..पण आज माझी पाळी आहे तुला रंग लावण्याची ...
मी विशेष सूत्रांकडून (चक्क नंदामाई सोबत कट रचला आहे :-) ) माहिती मिळवून ठेवली आहे की तू कोणत्या वेळी कुठे असतोस , काय करतोस , कधी येतोस आणि कधी जातोस ...मला ' टिप ' देखील मिळाली आहे तुझ्या चोर रस्त्यांची आणि तू लई पळकुट्या आहेस म्हणून संधी मिळताच तुझ्या वर हल्ला बोलायचा आहे ....तू दिसलास की मी माझे दोन्ही हाथ मागे लपवीन ..जणू तुला पाहिलेच नाही असे दर्शविन  ..आणि माई ने इशारा करताच माझ्या दोन्ही मुठ्ठीत बंद असलेला गुलाल तुझ्या वर उधलीण  ..न घाबरता तसाच उभा राहीन तुझ्या समोर ..तुझे रंगाने रंगलेले गोजिरे रूप न्ह्याळत ..तुझ्या चष्म्यावर पसरलेला गुलाल साफ करत तू माझ्या कडे रागाने पाहशील ... " पकडा की रे ह्याला " म्हणत तू मोठ्याने शिटी मारशील .... " आई वाचव " ओरडत मी ही तिथून पळ काढीन ....मागे वळून पाहताच  दिसेल मज संपूर्ण चंडिकाकूल सज्ज , माई जी होती माझ्या बाजूने दिसेल ती तुझ्या बाजूने उभी मस्त ...सर्वच तुझ्या बाजूने झाले , आता कुणास हाक मारू सुचेनासे झाले ....धावूनी येऊन उचलशील तू मला ...गुलाल पाण्याच्या हौधात बूडवशील तू मला..!!!
नंदामाई कडे पाहत पाहत मी ही गोड तक्रार करीन :
" बस्स काय ग माई,
 छान फसवले ग आई " :-) :-):-)


रंगपंचमीच्या अनिरुद्ध-आनंद-नंदामयी शुभेच्छा !!!
- हर्ष
श्री राम , मी अंबज्ञ आहे !!!

0 comments:

Post a Comment