Friday 10 April 2015

रक्तदान..... काळाची गरज!!!


पुढे येणारा काळ कसा असणार आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही … महागाई वाढत चालली आहे … पेट्रोल डीझलचे भाव दर महिन्याला वाढत चालले आहेत … जागतिक मंदी येत चालली आहे … पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे … हे सगळ असच चालत राहिल तर तिसर महायुद्ध दूर नाही!!! … समजा येणा-या काळात तिसर महायुद्ध झालं आणि त्यात भारताला ही अनेक देशांशी युद्ध करावं लागलं … देशाची फार मोठया प्रमाणावर हानी झाली आहे …युद्ध संपलं आहे…देश हळू हळू पूर्णपणे स्थिर होत आहे …जन-जीवन पुन्हा सुरळीत होत आहे पण नेमकं झालं काय आहे तर तिसर्‍या महायुद्धात देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी पुरवल्या गेलेल्या रक्ता मुळे , देशातल्या blood banks मध्ये रक्तच उरलं नाही आहे …तिसर्‍या महायुद्धात जगातील बहुतेक सर्वच देशांचा सहभाग असल्यामुळे कोणता ही देश एकमेकांना रक्ताच्या bottles विकत ही देत नाही आहे …. अश्या भारताचे चित्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे ….साल २०५० चालू आहे :

Saturday 4 April 2015

इच्छा , आकांक्षा , इत्यादी ……….

त्या  दिवशी तसा ऑफिसमधून निघायला उशीरच झाला होता..शेवटच्या क्षणापर्यंत काम संपतच नव्हतं... खाली थांबलेल्या कंपनी Cab ड्रायवरचा ही दोन वेळा फोन येऊन गेला होता. त्याला ५ मिनीट आणखी थांब अशी request केली होती.. ड्रायवरचा तिसऱ्यांदा call येत होता.. शेवटी वैतागून PC shut down करून, bag pack करून लिफ्टच्या दिशेने पळालो. खाली आलो आणि धावत जाऊन Cabमध्ये बसलो. ड्रायवरला sorry म्हणालो उशीर झाल्या बद्दल …त्याने "ठीक आहे साहेब " असे म्हणत गाडी स्टार्ट केली .. Cabमध्ये  बसताच सवयीप्रमाणे bagच्या पहिल्या कप्प्यामधून हेडफोन बाहेर काढला. कधी नाही ते हेडफोनच्या वायर्सचा गुंता झाला होता. सुटता सुटत नव्हता.. एका क्षणाला विचार आला गेल्या काही दिवसांपासून आयुष्यात ही असाच प्रश्नांचा गुंता झाला आहे.. प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध घडत आहे. प्रत्येक अंदाज चुकत आहे.. क्षणार्धात भानावर आलो आणि कसाबसा वायर्सचा गुंता सोडवला.. हेडफोनची पिन मोबाइलमधे प्लग केली आणि हेडफोन कानाला लावला .पण त्या दिवशी चित्त ठिकाण्यावर नव्हतं. त्यामुळे कोणतं ही गाणं अगदी 10 सेकंदाहून जास्त लक्ष्य केंद्रित करून घेऊ शकत नव्हतं. मनात असंख्य विचारांचे काहुर माजलेले होते. माझ्या PLAYLISTमधील गाणी मी सतत shuffle करत बसलो होतो.. mood change करण्याचा माझा हा प्रयास असफल ठरत होता . शेवटी 15-20 मिनिटानंतर एका गाण्याचे सुरुवातीचे शब्द मनाला आकर्षित करते झाले :

क्या करे जिंदगी
इसको हम जो मिले
इसकी जान खा गए
रात दिन के गिले ...
.