Friday 10 April 2015

रक्तदान..... काळाची गरज!!!


पुढे येणारा काळ कसा असणार आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही … महागाई वाढत चालली आहे … पेट्रोल डीझलचे भाव दर महिन्याला वाढत चालले आहेत … जागतिक मंदी येत चालली आहे … पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे … हे सगळ असच चालत राहिल तर तिसर महायुद्ध दूर नाही!!! … समजा येणा-या काळात तिसर महायुद्ध झालं आणि त्यात भारताला ही अनेक देशांशी युद्ध करावं लागलं … देशाची फार मोठया प्रमाणावर हानी झाली आहे …युद्ध संपलं आहे…देश हळू हळू पूर्णपणे स्थिर होत आहे …जन-जीवन पुन्हा सुरळीत होत आहे पण नेमकं झालं काय आहे तर तिसर्‍या महायुद्धात देशासाठी लढणा-या सैनिकांसाठी पुरवल्या गेलेल्या रक्ता मुळे , देशातल्या blood banks मध्ये रक्तच उरलं नाही आहे …तिसर्‍या महायुद्धात जगातील बहुतेक सर्वच देशांचा सहभाग असल्यामुळे कोणता ही देश एकमेकांना रक्ताच्या bottles विकत ही देत नाही आहे …. अश्या भारताचे चित्र तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे ….साल २०५० चालू आहे :

मुलगी प्रियकराला : ए मी नाही करू शकत तुझ्याशी लग्न ! त्या राहूल सोबत करणार आहे !!
प्रियकर : अगं पण का ? मला नौकरी लागली आहे आणि नवीन flat पण तर बुक केला आहे ! राहुल तर साधी नौकरी पण नाही करत आहे !
मुलगी : बघ तू रागवू नकोस , तुला तर माहित आहे पपांची तब्ब्येत हल्ली खूप नाजूक होत चालली आहे आणि राहुल regular blood donor आहे … त्याने मला promise केलं आहे तो दर वर्षी ४ bottles blood पपांसाठी देणार आहे … :-) :-) 

Office Appraisal Discussion :

बॉस : I'm Sorry Mr देशपांडे मी तुम्हाला या वेळी Promotion नाही देऊ शकत , Mr वर्मांना देत आहे मी Promotion !
देशपांडे : पण बॉस मी ह्या वर्षी सर्वात जास्त काम केलं , सर्व टार्गेट्स मीट केलेत , नवीन प्रोजेक्ट्स मिळवून दिलेत मग का असं ??
बॉस : ते सर्व ठीक आहे … मी तुमच नाव "Blood donation rejected because of low hemoglobin level" या लिस्ट मध्ये पाहिलं … Mr वर्मांच hemoglobin level perfect आहे आणि ते मला दर ३ महिन्याला blood देणार आहेत … मी त्यांच्या कडून तसं agreement सुद्धा sign करून घेतलं आहे … I'm really Sorry Mr देशपांडे !!!

मुलगा लग्नासाठी मुलगी पहायला गेला आहे :
मुलाची आई मुलीला : तू कुठे जॉब करत आहेस
मुलगी : कुठेच नाही , मी घरीच असते !!!
मुलाची आई मुलीला : बेटा तुला जेवण बनवता येतं ?
मुलगी : नाही
मुलाची आई मुलीला : अच्छा मग धुणी-भांडी वगैरे ?
मुलगी : नाही
मुलीची आई मधेच : " अहो आमची मुलगी universal blood donor आहे "

मुलगा , मुलाची आई , मुलाचे वडील : "आम्हाला मुलगी पसंत आहे"  :-) :-) 

Job Advertisements मध्ये एक line अशी असेल :
'Regular Blood Donors' will be given first preference and 'Universal Blood Donors' will get Joining Bonus !!! :-)

सुट्टीचे अर्ज असे असतील :

Employee : Boss मला ७ दिवसांची सुट्टी हवी आहे , राजस्थानला चालोय …
Boss : वा !! Nice ... Family Vacation ?
Employee : नाही तिथे एका गावात , एका लहानश्या हॉस्पिटल मध्ये एक ३५०ml ची रक्ताची bottle उरली आहे … ती लागणार आहे माझ्या सास-यांच्या  operationसाठी  )-:

तिसर महायुद्ध टाळणे हे आपल्या हातात आहे की नाही माहित नाही पण आपण सर्व नक्कीच नियमित रक्तदान करत राहिलो तर आपल्या blood banks नेहमीच भरलेल्या असतील आणि आपल्याला कोणत्या ही देशाकडे रक्त पुरवण्यासाठी हात पुढे नाही करावे लागणार ….

चला तर मग आपण सर्वच भेटू, १२ एप्रिल, २०१५ ह्या दिवशी...

पत्ता: 
Shri Harigurugram
New English High School
Kherwadi , Bandra East
Mumbai 400 051

- हर्ष पवार

0 comments:

Post a Comment