Monday 22 December 2014

सख्खे मित्र

मित्र आणि मैत्री आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक …बालवाडीतला पहिला दिवस आठवून पहा … त्या दिवशी झालेली तुमची रडारड आठवेल … आई बाबांचा हात सुटता सुटत नसतो पण तरी देखील ते तुम्हाला धीर देत, शांत करत वर्गात जाण्यासाठी पुढे करत असतात … पुढे पाउल टाकतांना तुम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे वळून त्यांना पाहत असता आणि कसे तरी जाऊन बाका वर बसता … डोळ्यातून अश्रूंचं वाहण चालूच असतं  … तेव्हा तिथे त्या बाकावर तुमच्या शेजारी  बसलेला तुमचा पहिला मित्र तुम्हाला भेटतो … बहुतेक वेळी हा तुमच्या शेजारी बसलेला मित्र तुमच्याहून थोडा धीट असतो … तो तुमच्याकडे पाहून सुंदर हसतो आणि जणू त्याचं हसणं तुम्हाला त्या लहान वयात ही धीर देऊन जात , तुमच रडणं बंद करून टाकतं … ' हो आहे कोणी तरी आपल्यासाठी इथे 'असं वाटतं … खरंतर तो पहिला दिवस बालवाडीतला, तुमचा मैत्रीच्या विश्वातील पदार्पणाचा पहिला दिवस असतो … तिथून सुरु होतो तुमचा प्रवास एका ' मैत्री ' नावाच्या सुवर्ण वाटे वरती …


पुढे तुम्ही जस जसे मोठे होत जाता तस तसा तुमचा मित्र परिवार ही वाढत जातो… शाळेतले मित्र, तुम्ही राहणा-या कॉलनी मधले मित्र, कॉलेज मधले मित्र आणि मग तुमच्या ऑफिस मधले मित्र … हल्ली तर आपल्या सर्वांची social networking sites वर अनेक लोकांशी मैत्री झालेली असते … पण ह्या एवढया सर्व मित्र परिवारांमध्ये , इतक्या friend circles मध्ये एक ग्रूप असतो जो तुमच्या सर्वात जास्त जवळचा असतो … मग तो ग्रूप तुमच्या शाळेतील मित्रांचा असो, कॉलनी मधली मित्र असो , कॉलेज व मग तुमच्या ऑफिस मधल्या मित्रांचा ग्रूप असो…काही मोजक्या मित्रांचा तुमचा एक ग्रूप असतो जो तुम्हाला आपला आपलासा वाटतो… त्यांना भेटून तुम्हाला कुठून दुरून थकून भागून घरी आल्यासारखं वाटतं …. त्यांना भेटून तुमचं  मन नुसतं सुखावत नाही तर त्यांच्या मध्ये मन रमतं ही… त्यांच्या सोबत वावरतांना तुम्हाला एक कमालीचा आत्मविश्वास वाटतो… सुदैवाने माझ्या कॉलनी मधल्या मित्रांचा माझा ही असा एक ग्रूप आहे….

माझ्या ह्या ग्रूपमुळे माझ्यामध्ये अनेक चांगले बदल घडून आलेत … माझी ही मित्र मंडळी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नुसतं माझ्या हो ला हो  नाही मिळवत… आणि ते सर्वात जास्त गरजेचे आहे जर आपल्याला आपला ख-या अर्थाने विकास घडवून आणायचा असेल तर… आम्ही एकमेकांना नेहमीच चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो व जर आमच्यातला कोणी चुकत असेल तर त्याला योग्यवेळी सावध ही करत असतो… कधी कधी मतभेद आमच्यामधेही नक्कीच होत असतात पण आम्ही प्रत्येकाच्या मताचा मान राखून सुवर्णमध्य काढत असतो …कोणती ही गोष्ट ताणून ठेवत नाही …
आजच्या काळामध्ये माझ्या अवतीभवती एवढे मित्र असतात …काही आपले खरे हितचिंतक तर काही नुसतं हितचिंतक असण्याचा दिखावा करणारे जागो जागी आपल्याला आढळतात … ह्या कलीयुगामध्ये जिथे खरी माणसं ओळखणं थोडं कठीण होऊन जातं तिथे  माझ्या सदगुरुंनी  , माझ्या अनिरुद्ध बापूंनी एक खूपच सोप्पं समीकरण आम्हाला देऊन ठेवलं आहे …. माझ्या प्रगतीने जळून न जाता ख-या अर्थाने जो खुश होतो तोच माझा खरा मित्र आहे असे बापू म्हणतात… आता खरे मित्र ओळखण्यात माझी गल्लत होत नाही…  बापूंनी दिलेल्या ह्या गुरुकिल्लीमुळे आता छानसा filter आपोआप लागला गेला आहे माझ्या मित्रांच्या यादीत … आणि हे जे असे माझ्या प्रगतीने खुश होणारे जे मित्र आहेत त्यांना मी ' जिवलग मित्र '  नाही म्हणत  … त्यांचं नाव मी थोडं वेगळं ठेवलं आहे …. अश्या माझ्या मित्रांना मी माझे "सख्खे मित्र" म्हणतो … आणि असे हे " सख्खे मित्र" आयुष्यामध्ये प्रत्येकाला प्राप्त होवो अशी प्रार्थना मी माझ्या सदगुरूंच्या चरणी करतो ….

माझ्या मते मैत्री हे जगातले सर्वात सुंदर नाते आहे… प्रसिध्द लेखक Rudyard Kipling ने लिहून ठेवलं आहे "God could not be everywhere, and therefore he made mothers " मी ह्याच्या एक पाउल पुढे जाऊन म्हणेन "Mothers could not be everywhere so God made Friends" …
आणि म्हणूनच कदाचित "तो" सुद्धा म्हणतो की " मी तुमचा मित्र आहे, कधीही दगा न देणारा मित्र"
Photo Credits : http://aniruddhapournimautsav.blogspot.in
 श्री राम 
~ हर्ष पवार

3 comments:

  1. very right harsh...
    mala majha balwadicha diwas aathavat nahiye kinva majha pahilam friend hi aathavat nahiye...
    pan tumhi je mandalay te atyant khare aahe.....
    mitra he sarvasthresth naat aahe...
    ani tumacha "TO" arthat "SADGURU" jar "MITRA" asel tar yasarakhe surekh naate konate naahi...

    ReplyDelete
  2. सख्खे मित्र..... ए मी पण आहे बरं का यात....

    ReplyDelete
  3. खुपच छान!

    ReplyDelete