Wednesday, 23 December 2015

अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!



अवघ्या विश्वावर तुझीच सत्ता 
घे जवळी मज गुरुदेव दत्ता 
स्मर्तुगामी कृपा करी आता
आहे तुझाच आसरा अवधूता  !


शुभ व शुभ्र प्रकाश तू दत्तात्रेया
परमातम्याची जणू तू निर्मल काया
अवतरला भूलोकी तू आली आमुची दया
आता नाही उरले कारण कोणा भया !!


दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त 
म्हणा मुखी आता फक्त 
करेल जो मन दत्ताशी आसक्त 
धन्य होणार तोची एक भक्त !!!


~ हर्ष पवार

1 comments: