Thursday 20 August 2015

सूर तेच छेडिता .....

गिटार हे एक असे वाद्य आहे ज्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते.बहुतेक सर्वांच्याच मनात कधी तरी आपण ही गिटार वाजवायला शिकावे हा विचार आलेला असतो. हिंदी सिनेमामध्ये तर गिटारला वेगळेच स्थान आहे. सिनेमामधील नायकाचे सर्वात आवडते वाद्य म्हणजे गिटार.गिटार म्हटल की आठवतो हातात गिटार घेऊन नायीकेच्या अवती-भवती "बार बार देखो हजार बार देखो" गाणारा शम्मी कपूर किंवा आठवतो नायीकेच्या अतीव सौंदर्याचे गिटार वाजवत "चेहरा हे या चाँद खिला हे" गाणारा ऋषी कपूर किंवा अगदी नजीकच्या काळातील सलमान खान आठवतो विदाउट शर्ट गिटार घेऊन "ओ ओ जाने जाना ढूंढे  तुझे दिवाना" गाताना. गिटारची लोकप्रियता वाढवण्यामध्ये हिंदी सिनेमाचे ही मोठे योगदान आहे असे म्हटले तर चुकीचे नाही.


गिटार वाजवणारी मुलं ही नेहमी शाळेत किंवा कॉलेजमध्ये इतर मुलांपेक्षा जास्त भाव खाउन जातात. जगभरातील मुली कोणत्या मुलांच्या प्रेमात अगदी  सहजपणे पडतात असा सर्वे केल्यावर  सर्वात अघाडीवर "गिटार वाजवता येणारी मुले " असा निष्कर्ष लागला. ब्रिटनमध्ये केलेल्या एका सर्वेमध्ये असे कळते  की जे पुरुष गिटार वाजवतात त्यांच्याकडे ९०% स्त्रिया आकर्षित होतात … हे सर्व सांगण्याचे कारण फ़क्त एवढेच की जेव्हा "मी गिटार वाजवायला शिकूया" असा निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय कशातून उदभवला आहे ते महत्वाचे आहे ...म्हणजे मला संगीत आवडते म्हणून मला गिटार शिकायचे आहे की मला गिटार कोणाला 'इम्प्रेस' करायला शिकायचे आहे ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने प्रामाणिकपणे शोधले पाहिजे ....कारण मी इतक्या वर्षांमध्ये एक अनुभवले की ज्यांनी गिटार कोणाला इम्प्रेस करण्यासाठी शिकायला घेतले त्यांचे गिटार शिकण्याचे भूत गरजेपुरते होते आणि मग त्यांचे गिटार भिंतीवर धूळ खात लटकत राहिले ( काही मोजके अपवाद नक्कीच असतील) ह्या उलट ज्यांचे मनापासून संगीत आणि गिटार शिकण्यावर प्रेम होते तेच पुढे यशस्वीरित्या गिटार शिकू शकले ...

सुदैवने मला असा मित्र परिवार लाभला जिथे बहुतेक मित्रांना गिटार वाजवायला येत होते...मला आठवते १०वीच्या परिक्षे नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत एके दिवशी माझा मित्र पराग पटेल मला म्हणाला '' तूला म्युझिकमध्ये एवढा इंटरेस्ट आहे मग तू गिटार का नाही शिकत ?'' ... परागने माझ्या दुसऱ्या मित्राला, रोहन कोरगांवकरला मला गिटार शिकवायला सांगितले आणि मी रोज रोहनकडे गिटार शिकू लागलो ...पाहता पाहता माझे 2 महिन्यांमध्ये गिटारचे प्राथमिक धडे शिकुन झाले होते आणि मी एखाद्या गाण्याची चाल गिटारवर वाजवू शकत होतो...

गिटार वाजवायला शिकणे हे कठीण आहे का ? माझे उत्तर 'नाही' असे आहे पण जसे प्रत्येक खेळाचे ,प्रत्येक कलेचे नियम असतात तसेच नियम इथे ही आहेत ...थोड़ी शिस्त आणि थोडी अंगी चिकाटी बाळगावी लागते गिटार शिकण्यासाठी  ...सुरुवातीला तुमचा गिटारवर नीट हात बसण्यासाठी खूप सराव करावा लागतो ..फ़क्त हा थोड़ा कठीण काळ तुम्ही व्यवस्थितरित्या पार केलात की पुढे गिटार शिकणे सोपे होते ....

मी आजपासून माझ्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येकाला गिटार वाजवतायावे म्हणून गिटारचे प्राथमिक धड़े शिकवणार आहे ...आज सर्वप्रथम आपण ह्या वाद्याचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया आणि गिटारच्या वेगवेगळ्या partsची नावे समजून घेऊया :

गिटार हे मुळात एक पाश्चात्य वाद्य आहे ज्याचा इतिहास सुमारे ४००० वर्ष इतका जुना आहे . गिटार हे "stringed instruments " च्या यादीत मोडतं ( सितार , व्हायोलिन , वीणा , सारंगी , रेबाब ). गिटार हे नाव संस्कृतमध्ये stringसाठी वापरल्या जाणा-या "तार" ह्या शब्दातून उद्भवले आहे . इंग्रजी शब्द गिटार, जर्मन Gitarre, आणि फ्रेंच guitare ही सर्व नावे  स्पॅनिश guitarra ह्या भाषेच्या नावांमधून आलेला शब्द आहे . स्पॅनिश guitarra हे अरबी qitara कडून आणि qitara लॅटिन  cithara कडून आणि cithara प्राचीन ग्रीक kithara कडून मिळालेले नाव आहे .

गिटारच्या वेगवेगळ्या पार्टसची नावे  :


खरे सांगतो मित्रांनो आयुष्यात सोबत गिटार असल्यामुळे कधी ही एकटेपणा जाणवला नाही ...दिवसभर थकून-भागून जेव्हा मी रात्री गिटार हाती घेऊन एखादे गाणे त्यावर वाजवतो तेव्हा २ मिनिटात सर्व थकवा कुठे निघुन जातो ते कळत नाही ...कदाचित ह्यालाच music therapy असे म्हणत असतील .
कोणाला पळण्याने ,कोणाला गाण्याने ,कोणाला नाचण्याने ,तर कोणाला अभिनयाने जी kick मिळते ती kick मला गिटार वाजवण्याने मिळते ....
पुढच्या भागात आपण गिटारचा पहिला धड़ा शिकूया.. तर मग आहात ना तुम्ही सर्व तय्यार ?

~ हर्ष पवार 

1 comments: