Friday 9 January 2015

केमिकल लोचा...सांभाळा!!!

हा शब्द ऐकून आठवतो मला माझ्या आवडता सिनेमा ' लगे रहो मुन्ना भाई ' मधला एक प्रसंग … मुन्ना भाईला सर्वीकडे गांधीजी दिसत असतात … त्यामुळे त्याची उडालेली तारांबळ आपण पाहिलेली आहे .आपल्यासाठी हा गमतीचा विषय असतो पण मुन्नाभाईसाठी हा गंभीर प्रकार असतो . ' त्याला गांधीजी दिसतात ' ह्या त्याच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नसतो …शेवटी मुन्नाभाई त्याच्या जिवलग मित्राला , सर्किटला आपली व्यथा वैतागून सांगतो " अपून के भेजे में साला केमीकल लोचा है " !


१३ डिसेंबर २०१४  रोजी , अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ( सदगुरु श्री अनिरुद्ध बापू) ह्यांनी  ' Self Health ' वर व्याख्यान केले … व्याख्यानामध्ये बापुंनी वेगवेगळ्या  उदभवणा-या आजारांवर चर्चा केली आणि त्यापासून आपण आपला बचाव कसा  करू शकतो हे उत्कृष्ट्यरित्या समजावून सांगितलं … Diabetes ह्या सर्वात कॉमन आणि तेवढ्याच भयंकर आजारावर बोलतांना बापुंनी Leptin नावाच्या hormone ची ओळख करून दिली 
ह्या Leptinचे जर शरीरामध्ये प्रमाण वाढले तर मग कसा गोंधळ उडतो हे डॉ. अनिरुद्ध समजावून सांगत असतांना मला  ' लगे रहो मुन्ना भाई ' मधला ' केमीकल लोचा ' हा शब्द आठवला. 

डॉ. अनिरुद्धांनी जे सांगितले ते पुढील प्रमाणे - 
आपण घरी चहामध्ये दररोज जी साखर वापरतो तिला Table Sugar म्हणतात . ह्यालाच Sucrose नावाची साखर म्हणतात. ह्या Sucrose मध्ये २ प्रकारच्या साखर असतात 
१) Glucose २)Fructose 
आपण Sucrose म्हणजे साखर खाल्ली की, Glucose वेगळं होतं आणि Fructose वेगळं होतं. शरीरात Glucose चा मार्ग वेगळा आणि Fructose चा मार्ग वेगळा. 
Glucose पोटात गेल्या नंतर Insulin नावाचं द्रव्य तय्यार होतं आणि मग इन्सुलिन ग्लुकोजला पचवत. इन्सुलिनमुळे, Glucose आपल्या स्थ्यायूमध्ये, हार्टमध्ये , मेंदूमध्ये जातं आणि आपण टवटवीत राहतो. 

डायबेटीस कंट्रोलमध्ये येत नसेल तर इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात. इन्सुलिन हे चांगलेच द्रव्य आहे जे ग्लुकोजमध्ये मिसळत. पण तेच जेव्हा खूप प्रमाणात वाढतं तेव्हा इन्सुलिनचा धोका ही वाढतो . चांगलं इन्सुलिन अनेक गोष्टींमुळे प्रमाणापेक्षा वाढतं. आपण सतत खात राहतो, तेव्हा प्रत्येकवेळी Insulin वाढत राहते, त्यातून Leptin तयार होतं . 
Leptin आमची भूक थांबवत. आमचं जास्त खाणं थांबवित. चरबी जमा व्हायला विरोध करतं. 
जास्त वाढणारं Insulin Leptin ला दाबून टाकतं आणि आमची खायची इच्छाही वाढत राहते. आम्ही खात राहतो खाल्ल्यानंतरच आपल्याला बरं वाटतं. 
काहीजण २-३ तास खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. त्यात त्यांची काही चूक नाही. त्यांच्या शरीरामध्ये Leptin-Insulin चा खेळ चालेला असतो. 
जे काम Leptin ने करायला पाहिजे, ते काम Leptin करू शकत नाही. 

त्याच बरोबर Ghrelin नावाचा Hormone असतो. तो कायम भूकेलाच असतो. तो मेंदूला सतत सिग्नल पाठवत असतो की भूक लागली-भूक लागली मला खायला द्या - मला खायला द्या. त्याला दाबायचं काम Leptin करत असतं आणि जर Leptin हे काम करत नसेल तर ते चूक आणि Leptin कधी काम करत नाही ? जेव्हा आम्ही जास्तीत जास्त गोड पदार्थ खात राहतो, चरबीयुक्त पदार्थ खात राहतो, वारंवार आणि जास्त प्रमाणात खात राहतो. तेव्हा आपोआप Leptin काम करत नाही. त्यामुळे शरीरात चरबी वाढते. रक्तात चरबी वाढते. मग ते चरबीयुक्त रक्त मेंदूत गेल्यामुळे Paralysis होतो किंवा Heart मध्ये जाऊन Heart Attack होतो. त्याच बरोबर लिव्हर (Liver ) ही आजारी होतो आणि लिव्हर आजारी झालं की, आणखी अनेक सगळ्या विकारांना तोंड द्यावंच लागतं. 

Insulin चांगलंच आहे पण वारंवार गोड खाल्लं, वारंवार आम्ही जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्लेत की खूप जास्त प्रमाणात Insulin तय्यार होत राहत आणि खूप जास्त प्रमाणात Insulin तयार झालं की Leptin ला दाबत . 

Leptin अशी इच्छा निर्माण करतं की भूक थांबलेली आहे, तू आता खाऊ नकोस. मेंदू तू आता शांत राहा. मेंदूला जाणीव करून दिली जाते की आता काही खाण्याची गरज नाही आहे. त्यामुळे रक्तातली किंवा मेंदूतली चरबी वाढत नाही .

ह्या माहितीमुळे एक लक्षात आले की स्वतःच्या खाण्यावर कंट्रोल ठेवणे अत्यंत मह्त्त्वाचे आहे. आपल्याला ह्या केमीकल लोच्यापासून नक्कीच स्वताचा बचाव करता येतो. गरज असते फक्त एक 'आरोग्यपूर्ण जीवनशैली ' स्वीकारण्याची. 

गोड आणि चरबीयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाणे, Processed Foods टाळणे (Soft drinks, Corn syrup, Cookies, Cake, Muffins), Fiber Foods चा आहार वाढवणे (Cauliflower, Broccoli, Cabbage , Oranges , Raspberries , Apples ) , Proteins चा आहार वाढवणे ( Fish , Eggs , Yogurt, Milk ) …. ह्या  गोष्टींच्या बरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे माझी झोप पूर्ण व्हायला हवी आणि मी नियमित व्यायाम केलाच पाहिजे ….Dieting केल्याने मला तात्पुरते रिझल्टस मिळतात पण दीर्घकालीन स्वास्थ्य हवं असेल तर मला एक 'आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा' पाठपुरावा करावयास हवा !

या सर्व गोष्टीचा अभ्यास  केल्या नंतर एक गोष्ट माझ्या लक्ष्यात येते की माझ्या आयुष्यामध्ये ही असेच 'लोचे'  माझ्याच चुकीच्या वागण्यामुळे आणि एखाद्या गोष्टीच्या अमर्याद मोहात पडण्यामुळे घडत असतात … त्यामुळे ' मर्यादापालन' हे झालेच पाहिजे …आणि हे तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मी माझे ध्येय गाठण्यासाठी नियमित व योग्य प्रयास करत राहतो आणि माझ्या प्रयासांना भक्तीची संगत लाभते….  मग माझ्या आयुष्यामध्ये कोणताच लोचा उदभवू शकत नाही आणि उदभवलाच तर फार काळ टिकू शकत नाही!

 'लगे रहो मुन्ना भाई' मधलाच आणखी एक प्रसंग आठवला … जेव्हा Happy Singh मुन्ना भाईला विचारतो "मेरे पास पुलीस है, पावर है, पैसा है, तेरे पास क्या है ? "तेव्हा मुन्ना भाई शांतपणे त्याला उत्तर देतो "अपून के पास ? अपून के पास बापू है मामू " … माझ्या ही आयुष्या मधल्या लोच्यांना माझे उत्तर काही मुन्नाभाई पेक्षा फार से अलग नसेल … समझे क्या मामू :-) 

3 comments:

  1. Very nice info and its very useful to everyone...

    ReplyDelete
  2. हर्ष आपले सदगुरु डॉक्टर अनिरुध्द जोशींनी त्यांच्या आरोग्यविषयक व्याख्यानात Diabetes ह्या सर्वसामान्यांना तापदायक ठरलेल्या आजाराचे सुंदर रीत्या विश्लेषण करून बचावात्मक पर्यायही उपलब्ध करून दिलेले आपल्या लेखातून जाणवले. खूप महत्त्वाची माहिती आपणही खूपच सहज सोप्या भाषेतून दिली आहेत, ह्याचा वाचकांना जरूर लाभ घेता येईल. कोणत्याही आजाराने डगमगून न जाता , विचलीत न होता, शांतपणे अभ्यास केल्यास मार्ग सापडतोच जेणे करून आपले जीवन सुसह्य होवू शकते असा सकारत्मक आशावाद जागृत करण्यास हा लेख मोलाचे सहकार्य नक्कीच करेल.

    ReplyDelete